रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जानेवारी 2018 (16:18 IST)

सारा अली खान झाली 'ट्रोल'

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून त्यावरून तिला ट्रोलही केले जात आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या फ्रेंड्ससोबत मस्ती करत आहे. ती बेडवर दिसत असून 'आशिकी २'चे गाणे बेसूऱ्या आवाजात गात आहे. तिचा एक मित्र या गाण्यावर गिटार वाजवत आहे. 

सध्याची सारा आणि व्हिडिओतील सारा खूपच वेगळी दिसत आहे.  सध्या सारा 'केदारनाथ'या तिच्या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात तिच्यासोबत सुशांत सिंह दिसणार आहे.