मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:49 IST)

ऐश्र्वर्याने घेतले 10 कोटी मानधन!

सध्या प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, कंगना राणावत या बॉलिवूडधील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्री आहेत. पण बच्चन सुनेलादेखील या यादीत आपले नाव सामावून घ्यायचे असे दिसत आहे. चित्रपटसृष्टीपासून लग्न, मुलगी यामुळे लांब गेलेली ऐश्र्वर्या पुन्हा एकदा आपले स्थान निर्माण करू पाहत आहे. पण आता ऐश्र्वर्या 'रात और दिन' या नर्गिस दत्त यांच्याचित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नर्गिस यांनी यात मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऐश्र्वर्या दुहेरी भूकिेत दिसणार आहे. 
 
तिला भूमिकेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर या कामाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केल्याने इतर कामांकडे पाठ फिरवावी लागेल. तिने तब्बल 10 कोटींचे या चित्रपटासाठी मानधन घेतल्याचे वृत्त आहे. आणि निर्मात्यांनी तिची ही मागणी कोणत्याही आडकाठीशिवाय मान्य केली आहे.