शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 नोव्हेंबर 2017 (10:32 IST)

दहावीच्या नृत्य, संगीताचे मार्क कापले

दहावीत शास्त्रीय नृत्य, संगीत यांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ५ ते १५ गुण देण्यात येत होते. मात्र आता नृत्य किंवा संगीताच्या शासनमान्य संस्थेने घेतलेल्या परीक्षेत किती गुण मिळाले किंवा श्रेणी मिळाली त्यावर अतिरिक्त गुण अवलंबून असणार आहेत. किमान तीन ते कमाल १५ गुण विद्यार्थ्यांना मिळू शकतील.

राज्य किंवा राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांन २५ गुण देण्यात येत होते. ते आता मिळू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्यांला क्रीडा किंवा एकाच कलाप्रकाराचे गुण मिळू शकतील.  चित्रपटामध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही आता अतिरिक्त गुण मिळू शकतील. त्याचप्रमाणे बाहेरून परीक्षा देणाऱ्या (१७ क्रमांकाचा अर्ज) विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त गुणांची सवलत मिळू शकेल. 
 
अकरावीच्या प्रवेशासाठी कलेतील प्राविण्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकणार नाही. अकरावीला महविद्यालयांमध्ये कलाकार विद्यार्थ्यांसाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.