रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:29 IST)

राखी सावंत बोहल्यावर चढणार

अभिनेत्री राखी सावंतचा एक्स बॉयफ्रेण्ड बोहल्यावर चढणार आहे. राखीसोबत तीन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर विभक्त झालेला अभिनेता अभिषेक अवस्थी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे. अभिषेक अंकिता गोस्वामीसोबत पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही बातमी जाहीर केली आहे.

अभिषेक अवस्थीचं नाव एका टॅलेंट शोमुळे ओळखीचं झालं.  'नच बलिये 3' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दोघं रनर अप ठरले होते. अभिषेक सब टीव्हीवरील 'खिडकी' या कार्यक्रमात दिसला होता. लाईफ ओके वाहिनीवरील 'चंद्रकांता- प्रेम या पहेली' या मालिकेत तो झळकणार आहे.