सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पँट न घालता मेट्रो प्रवास

या विचित्र प्रकाराची सुरुवात न्यूयॉर्क येथून झाली आणि आता अनेक देशांमध्ये पसरली. जर्मनीच्या अनेक शहरांमध्ये 7 जानेवारी रोजी लोकांनी पँट घातल्याविना मेट्रो मध्ये प्रवास केला.
 
2002 मध्ये पहिल्यांदा हा प्रकार बघितला गेला होता आणि आता दर वर्षी वर्षातून एकदा तरी पँट घातल्याविना प्रवास करतात. जर्मनीमध्ये बर्लिन, म्यूनिख आणि हॅम्बर्ग येथे पँट न घातलेले तरुण बघितले गेले. लोकांनी फेसबुकद्वारे संदेश पाठवले. बर्लिनमध्ये सुमारे 70 ते 80 लोकांनी या इव्हेंटमध्ये भाग घेतला. फेसबुकद्वारे ये स्पष्ट करण्यात आले होते की हे केवळ मनोरंजन म्हणून करण्यात येत असून कुणालाही त्रास देणे याचा उद्देश्य नाही.
 
तरुणांना अपील करण्यात आली होती की मद्यपान करून किंवा लहान अंडरवेअर घालून प्रवास करू नये ज्याने इतर लोकांना त्रास नसावा. जर्मनीमध्ये या इव्हेंटचे आयोजक डानिएल पी यांनी सांगितले की याचे उद्देश्य केवळ बस प्रवाशांचे चेहरे बघणे आणि मस्ती करणे आहे.
 
न्यूयॉर्कमध्ये केवळ 7 लोकांनी याची सुरुवात केली होती आणि दुनियेतील 25 देश यात सामील आहे. अंदाजे 60 शहरांमध्ये नो पँट्स सबवे राइड आयोजित झाले असून एकूण 10,000 लोकांनी यात भाग घेतला. सर्वाधिक 4,000 लोकं तर न्यूयॉर्क येथे दिसले. हे नेहमी जानेवरीच्या अतिशय थंडीत आयोजित केलं जातं.