बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रेयसीला कंटाळून कारला श्वान लूक

न्यूयॉर्क- प्रेयसीच्या सारख्या लिफ्ट मागण्याच्या सवयीला कंटाळून एका युवकाने चक्क स्वत:च्या कारला श्वानाचा लूक दिला आहे. साधरण एखाद्या श्वानासारख्या दिसणार्‍या या गाडीच्या मालकाचे नाव आहे सॅम वेलमॅन.
 
काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीसाठी त्याने गाडी खरेदी केली होती, पण ही गाडी चालवण्याऐवजी ती सारखी सॅमकडून लिफ्ट मागू लागली. कुठेही जायचे असेल तर ती सॅमलाच गाडी चालवायची विनंती करु लागली. तिच्या अशा वागण्यामुळे कंटाळून सॅमने एक भन्नाट उपाय शोधून काढला. त्याने आपली गाडी चक्क कुत्र्याच्या आकारात मॉडीफाय करुन घेतली.
 
गाडीच्या बाह्यभागावर त्याने कुत्र्याच्या अंगावर असते तशी फर लावून घेतली इतकेच कशाला त्याने गाडीच्या मागे एक छोटीशी शेपटीही बसवली.