शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ओबामा यांचे ट्विट इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे झालेल्या हिंसेविरोधात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्यस मंडेला यांची आठवण काढत एक ट्विट केले होते. हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनले आहे. आत्तापर्यंत सुमारे 28 लाख लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच 12 लाखाहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. 
 
न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे काही हिंसक घटना घडल्या होत्या. त्याविरोधात ओबामा यांनी हे ट्विट केले आहे. कोणतीही व्यक्ती वर्ण, मातृभूमी आणि धर्म यांच्यामुळे दुसऱ्याबाबत भेदभाव मनात ठेऊन जन्म घेत नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये ओबामांचे एक छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते एका खिडकीमध्ये उभ्या असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या आणि वंशाच्या मुलांकडे पाहत आहेत. 
 
दरम्यान, ट्विटरने ओबामांनी केलेले हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनल्याचे सांगितले.