मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

विराटला आवडत नाही प्रेयसीची ही गोष्ट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्यांदाच एका शोमध्ये झळकणार आहेत. दिवाळीच्या दरम्यान प्रसारित होणार्‍या या शोचे मुंबईतील स्टुडिओत शू‍टिंग पार पडले. सीक्रेट सुपरस्टार या चित्रपटाच्या प्रमोशनमधून ‍सुट्टी घेत आमिर खान आणि क्रिकेट सामन्यातून विश्रांती घेत विराट यांनी शोमध्ये धमाल मस्ती केली.
 
आमिर आणि विराटचा शूटिंगदरम्यानचा एक फोटोही प्रसिद्ध झाला आहे. प्रेक्षकांना दोघेही पहिल्यांदाच एका स्टेजवर पाहायला मिळणार आहेत.
 
यावेळी विराटने आपली गर्लफ्रेंड आणि तिच्याशी असलेल्या नात्याचा खुलासा केला. तुझ्या गर्लफ्रेंडची एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग असे आमिर विराटला म्हणाला. याचे उत्तर देताना विराट म्हणाला, तिची चांगली गोष्ट म्हणजे ती खूपच प्रामाणिक आणि काळजी घेणारी आहे. वाईट गोष्ट ही की ती नेहमी 5-7 मिनीटे उशीरा येते. आता विराटची गर्लफ्रेंड कोण? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.