मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

विराटला कोठडीत टाकायला हवे!

Kamaal Khan tweets on Virat Kohli
स्वत:ला महान क्रिटिक समजणारे कमाल खानने चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या पराभवावर अनेक ट्विट्स केले. त्याच्याप्रमाणे मॅच फिक्स होता आणि भारतीय खेळाडू विकले गेले होते. ज्याप्रकारे भारतीय फलंदाज पाक गोलंदाजांच्या शरणी गेले ते हैराण करणारे होते. त्याने ट्विट केले:
1. पाकिस्तान टीमला शुभेच्छा, चॅम्पियन्स ट्रॉफीत जिंकल्याची आणि विराटच्या टीमची सार्वजनिकपणे घेतल्याची.
2. 10 फिक्सर्सने केवळ 82 धावा घेतल्या जेव्हाकि हार्दिक पंड्या याने एकट्याने 76 रन बनवले.
3. कोहलीचा कॅच सुटला तर त्याने लगेच दुसर्‍याच बॉलवर कॅच दिला. त्याला फिक्सिंग पकडल्या जाण्याची भीती वाटली नाही.
4. पंड्याला मात्र फिक्सिंगबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तो मॅच जिंकवण्याचा प्रयत्न करत होता पण फिक्सर जडेजाने त्याला रनआउट करवले.


5. हे खेळाडू देशासाठी नव्हे तर सॅलरी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्क्रिप्टप्रमाणे खेळतात.
6. युवराज, कोहली, धोनी, धवन या सर्वांना मी देशद्रोही 2 यात रोल ऑफर करू इच्छितो. कारण आपण 130 कोटी भारतीयांना सहजरीत्या धोका देऊ शकतात.
7. कोहली, युवराज आणि धोनी यांना जरादेखील लाज वाटत असेल तर त्यांनी लगेच संन्यास घ्यावा.
8. विराटावर तर आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घालायला हवी. त्याने 130 कोटी भारतीयांचे गौरव पाकिस्तानाला विकले. त्याला तर कोठडीत टाकायला हवे.