गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

हिटलरच्या हाफ पँटला मिळणार लाखोंची किंमत

न्यूयॉर्क- साठ लाख ज्यूंची हत्या करणारा आणि जगाला दुसर्‍या महायुद्धाच्या खाईत लोटणारा जर्मनीचा हुकूम अॅडॉल्फ हिटलर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी त्याचे चर्चेत येणे हे काहीसे हटके कारणामुळे आहे.
 
अमेरिकेत होणार्‍या एका लिलावात हिटलरच्या चक्क बॉक्सर शॉर्टस्ची अर्थात हाफ पँटची बोली लागणार आहे. हिटलरच्या या हाफ पँटला 5,000 अमेरिकी डॉलर (भारतीय रूपयांत सुमारे 3,19,800 लाख रूपये) इतकी बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.