गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

एका रात्रीत 4,000 डास मारणारे यंत्र

न्यूयॉर्क- उन्हाळा- पावसाळ्यात संपूर्ण जगात डासांच्या सुळसुळाटने लोक त्रस्त होत असतात. मलेरिया, डेंग्यू, झिकासारख्या घातक आजरांचा फैलावही आफ्रिका किंवा विकसनशील देशांमध्येच नव्हे तर निम्मयापेक्षा जास्त अमेरिकेत डासांचा उपद्रव आहे. एका माणसाने त्यावर उपाय म्हणून एक अफलातून यंत्र बनवले आहे. त्याने कोणत्याही हायटेक यंत्राचा किंवा रसायनाचा वापर न करता डासांना नष्ट करणारे उपकरण बनवले आहे. त्याच्या सहाय्याने एका रात्रीत चार हजारपेक्षाही अधिक डासांचा खातमा होऊ शकतो. रोजस नावाच्या माणसाने हे उपकरण बनवले आहे. ते त्याने माणसांसाठी नव्हे तर आपला पाळीव कुत्रा रॉकीसाठी बनवण्याचे ठरवले होते हे विशेष!
 
तो आधी रॉकीला एका जाळीत ठेवत असे व त्यापुढे पंखाही लावत असे. मात्र, या उपायानेही डास हटत नाहीत असे दिसल्यावर त्याला एक कल्पना सुचली. त्याने एका पंख्यावर बारीक छिद्रांची जाळी बांधून डासांना मारण्याचा उपाय केला. हे फॅन अधिक क्षमतेने हवा खेचून घेतात. फॅनच्या एका बाजूला जाळी लावल्याने डास त्यामध्ये अडकून बसू लागले. फॅन सुरू केल्यावर काही तासांमध्येच हजारो डास जाळीत अडकतात, असे त्याला दिसले.