मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

साराला मिळाला आणखी एक चित्रपट

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानला आणखी एक बिग बजेट चित्रपट मिळाला आहे. सारा केदारनाथ या चित्रपटानंतर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा या चित्रपटात झळकणार आहे.
 
या चित्रपटाच्या निर्मितीबाबत रोहित घोषणा करण्यापूर्वी स्वत: साराने या चित्रपटात काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून रंगत निर्माण केली होती. मात्र या निवडीमागे सैफचा मोठा हात असल्याचे समजते.
 
एका मुलाखतीत सैफ म्हणाला केदारनाथ चित्रपटाचा वाद सर्वांसमोर आला होता तेव्हा मी चिंतेत होतो. हा चित्रपट कधी प्रदर्शित होइल हे निश्चित नसल्याने साराच्या कारकिर्दीला योग्य सुरुवात व्हावी अशी माझी अेपक्षा होती. तसेच साराला सिम्बा चित्रपट मिळावा, यासाठीही धडपडत होती असे ही तो म्हणाला.
 
दरम्यान, करण जोहरच्या चि‍त्रपटातून साराने बॉलीवूडमध्ये पदार्पण करावे, अशी सैफ अलीची इच्छा होती मात्र साराची आई अमृता सिंहचा याला विरोध असल्याने तिने केदारनाथाला होकार दिला होता, अशी चर्चा आहे.