1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018 (17:05 IST)

'स्केअर्ड गेम्स' चा पहिला लूक प्रदर्शित

Sacred Games: Saif Ali Khan

नेटफ्लिक्सवर पहिल्यांदा भारतीय निर्मिती असलेली वेबसीरीज 'स्केअर्ड गेम्स' चा पहिला लूक रसिकांसमोर आला आहे.  वेबसीरीजमध्ये राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्धिक सोबत सैफ अली खानदेखील झळकणार आहे. पहिल्याच लूकमध्ये सैफच्या हातामध्ये बंदूक आणि रक्ताने माखलेला लूक दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्धिकी शांत आणि राधिका आपाटे एका हटके लूकमध्ये दिसणार आहे. 

'स्केअर्ड गेम्स' ही कादंबरी आहे. या कादंबरीचे रूपांतर वेबसीरीजमध्ये करण्यात आले आहे. लेखक विक्रम चंद्रा यांनी ही कादंबरी लिहली आहे. आठ सीरीजमध्ये हा शो रसिकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे दिग्दर्शन  विक्रमादित्य मोटवाने आणि अनुराग कश्यप यांनी केले आहे.  पोलिस आणि गॅगस्टर यांच्यासोबत माफिया, राजकारणांचा खेळ खास रोमांचक अंदाजात दिसणार आहे. सरताज सिंह या एका पोलिस ऑफिसरच्या रूपात दिसणार आहे. एका गॅंगस्टॅरला पकडण्यासाठी त्याला फोन येतो आणि याकरिता त्याचा थरारक प्रवास वेवसीरीजमध्ये पाहता येणार आहे.