गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (22:35 IST)

दगडूशेठ गणपतीशी संबंधित अनेक रंजक गोष्टी आहेत, नेहमी भाविकांची गर्दी असते

dagdusheth halwai ganpati pune
31 ऑगस्ट गणेश चतुर्थी पासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू आहे.भगवान गणेशाला हिंदू धर्मातले आराध्य  दैवत मानले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते.देश-विदेशात विघ्नहर्ता गणेशाची अनेक भव्य मंदिरे असून, तेथे वर्षभर भाविकांची गर्दी असते.आम्ही तुम्हाला 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर' या मंदिराशी संबंधित अनेक रंजक गोष्टी सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊ या.
 
दगडूशेठ गणपतीशी संबंधित अनेक तथ्ये आहेत.असे सांगितले जाते की दगडूसेठ हे मिठाईचे व्यवसायिक होते आणि ते कलकत्त्याहून पुण्यात मिठाईचे  काम करण्यासाठी आले होते.याच काळात पुण्यात प्लेगची साथ पसरली, तेव्हा दगडूसेठने आपला मुलगा गमावला.त्यानंतर मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी दगडूसेठ हलवाईने हे गणेशाचे मंदिर बांधले. 
 
दगडूशेठ हलवाई ने 1893 साली गणपतीचे मंदिर बांधले आणि गणपतीची मूर्ती स्थापिली.मंदिरात कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नाही, हे दगडू शेठगणपती  नवसाला पावणारे आहे. 
 
गणेशोत्सवाच्या सुरुवातीबद्दल असेही म्हटले जाते की स्वातंत्र्यसेनानी बाळ गंगाधर टिळक यांनी सर्वप्रथम याच मंदिरात गणेशोत्सव सुरू केला. 
 
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीच्या केवळ मुखावर 8 किलो सोन्याचे काम करण्यात आले आहे.या मूर्तीमध्ये गणपतीचे दोन्ही कान सोन्याचे असून मुकुटाचे वजन 9 किलो आहे. 
 
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर कुठे आहे ?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर महाराष्ट्रातील पुणे शहरात आहे.या मंदिराशी संबंधित अनेक आख्यायिका आहेत.
 
दगडू शेठ गणपती मंदिरात कधी जावे-
हे मंदिर वर्षातील कोणत्याही दिवशी सुंदर दिसत असले तरी गणेशोत्सवाच्या काळात येथे वेगळेच सौंदर्य पाहायला मिळते.आकर्षक रंगीबेरंगी पताके या मंदिराची आणि फुलांनी गणपतीची आरास केली जाते. हे  पाहण्याचा आनंद वेगळाच असतो.