शनिवारची आरती

Last Modified शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (09:14 IST)
पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥
झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥
रत्‍न खचित आसन घातलें कुसरी ॥
तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥
आरति (भावार्थी) ओवाळूं तुज एक चित्तीं ॥जयदेव० ॥धृ०॥
पुष्पवासिक तेल आणिलें अपुर्व ॥
सर्वांगीं चर्चिन तुज मी सुंदर ॥
नाना परिमळ सहित उटणें तुजलावी ॥
यावें यावें मोरया उशीर तूं न लावी ॥जयदेव० ॥२॥
उष्णोदक देवा आणिलें तुजकारणें ॥
तयासीं उपमा काय देऊं मी नेणें ॥
आपुले हस्तें करुनि घालिन तुज वरी ॥
सनाथ करी मोरया येंई लवकरी ॥जयदेव० ॥३॥

ऐसी करुणा ऐकूनी आले गणपती ॥
समर्पिलें तयासीं अनुक्रमें एक चित्तीं ॥
आणुनि पीतांबर कासे कसिला ॥
तयाच्या प्रकाशें दिनकर लोपला ॥जयदेव० ॥४॥
कस्तुरी मळवट भाळीं रेखिला ॥
तयावरी मुक्ताफळाच्या अक्षता शोभल्या ॥
बावन चंदन कैसा अंगीं चर्चीला ॥
अनेक पुष्पांच्या (दुर्वांच्या) माळा शोभल्या ॥जयदेव० ॥५॥

आणुनि धूपदीप दाखविला भक्ता ॥
नैवेद्य समर्पिला तुज मंगलमूर्ती ॥
त्रयोदशगूणी तांबूल मूखीं शोभतो ॥
सुरंग रंगित दंत दिसतो सूरेख ॥जयदेव० ॥६॥

सूवर्ण दक्षिणा चरणीं (पायीं) ठेविली ॥
पंचप्राण करुनि तुज निरांजनी ॥
पुष्पांजली कैसी वाहिली तुजसीं ॥
पूजा मी करुं नेणे मज क्षमा करी ॥जय० ॥७॥
सुरेख मंचक कैसा घातला मंदिरीं ॥
तयावरी पासोडा शोभे कुसरी ॥
नाना पुष्प याती तयावरी शोभती ॥
तेथें (मोरया) निद्रा करी तूं मंगलमूर्ति ॥जयदेव० ॥८॥

ऐसें शेजेवरी पहुडले गणपती ॥
सिद्धि बुद्धि चरण संवाहन करिती ॥
भक्तासीं आज्ञा देतो गणपती ॥
आणिक वर्णूं नेणें मी अल्पमती ॥जयदेव० ॥९॥

ऐसी शेज तुझी न वर्णवे वाणी ॥
श्रमला शेष हा राहिला मौनी ॥
कृपा करी तूं दीना (दासा) लागूनी ॥
दास तुझा विनवितो ह्मणे चिंतामणी ॥जयदेव ॥१०॥


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

नवरात्र विशेष : नवदुर्गेच्या उत्सवाला नवरात्र का म्हणतात

नवरात्र विशेष : नवदुर्गेच्या उत्सवाला नवरात्र का म्हणतात
हिंदू धर्मात असे बरेच सण आहे ज्यांचा मध्ये रात्री शब्दाचा उल्लेख केला आहे. जसे नवरात्र ...

स्वयंभू असे हे शक्तिपीठं 'वणीची देवी सप्तशृंगी'

स्वयंभू असे हे शक्तिपीठं 'वणीची देवी सप्तशृंगी'
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. ...

नवरात्र विशेष रेसिपी : हे चवदार पदार्थ करुन तर बघा

नवरात्र विशेष रेसिपी : हे चवदार पदार्थ करुन तर बघा
नवरात्र म्हटलं की उपवास आलाच. आता आपण आपल्या उपवासाला देखील काही चविष्ट पदार्थ करू शकता. ...

'चंद्रघंटा' आकर्षण वाढविणारी देवी

'चंद्रघंटा' आकर्षण वाढविणारी देवी
दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची ...

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

श्री महालक्ष्मी कोल्हापूर
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन ...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...