गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : बुधवार, 18 डिसेंबर 2024 (07:58 IST)

टिटवाळा येथील महागणपती

ganpatibappa
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ हे इच्छापूर्ती श्री महागणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. अशी श्रद्धा आहे की या गणपतींच्या अशीर्वादाने लग्नाची इच्छा पूर्ण होते म्हणून ह्या गपणपती बाप्पांच्या भक्तांमध्ये तरुण–तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. पूर्वी येथे कण्वऋषींचा आश्रम होता. याच महागणपतीची पूजा शकुंतलेने केली होती. म्हणून या महागणपतीस 'विवाहविनायक' असेही म्हणतात. 
 
कल्याण-कसारा मार्गावर नदीच्या काठावर असलेले हे देऊळ खूप प्राचीन असून शकुंतलेले त्याची मूळ बांधणी केली असल्याची आख्यायिका आहे. एका सरोवरात हे देऊळ बांधले आहे. काळाच्या ओघात यामध्ये गाळ साचून हे देऊळ गाडले गेले आणि सरोवर नाममात्र राहिले. तसेच माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळावेळी पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले. व यादरम्यान जसेच्या तसे देउळ सापडले. अभंग स्वरूपात देवाची मूर्तीही  मिळाली. माधवराव पेशव्यांनी वसईची लढाई जिंकल्यावर या देवळाचे पुनरुत्थान केले. तसेच लाकडी सभामंडप देवळासमोर बांधला. या सभामंडपाचे पुनर्नवीकरण १९९५-९६मध्ये केले.
 
मंदिर- 
टिटवाळा येथील गणपतीचे मंदिर साधे आहेत. तसेच शेंदुराने माखलेला गणपतीबाप्पा मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतो. तसेच मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. गणपतींच्या मुर्तीला नेहमी पितांबर नेसवला जातो. तसेच मंदिरात चांदीची छत्री आहे. मंदिराच्या परिसरात एक छोटी दीपमाळ आहे आणि मंदिराच्या मागे एक सरोवर देखील आहे. 
 
गणपतीची मूर्ती अशी आहे- 
हे मंदिर ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे नदीच्या काठावर बांधले आहे. मंदिरात साडेतीन फूट उंचीची शेंदुराने माखलेली गणपतीची मूर्ती आहे. नाभी व मूर्तीचे डोळे सफ्टीक मण्यांची आहे. या मूर्तीच्या चरणांशी यक्ष-गंधर्व आहे तर डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहे. तसेच गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. अशी मान्यता आहे की या गणपती बापांच्या अशीर्वादाने मुला-मुलींचे विवाह लवकर जुळतात. व सभा मंडपात चांदीचा उंदीर आहे व भक्तगण या उंदीरच्या कानात आपली इच्छा सांगतात.  
 
आख्यायिका- 
पुराणकाळात शकुंतलेची विस्मृती राजा दुष्यंतला झाली. तसेच यानंतर या गणपतीची स्थापना कण्व मुनींनी केली व शकुंतलेस उपासना करण्यास सांगितले. शकुंतलेले मुनींनी सांगितल्या प्रमाणे उपासना केली आणि ऋषि दुर्वासांच्या शापातून मुक्त झाली. त्यानंतर राजा दुश्यंतला शंकुतला आठवली व नंतर शकुंतला- दुष्यंत यांचे परत मिलन झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. शकुंतलेला शाप ऋषि दुर्वासांचे यथायोग्य स्वागत केले नसल्याने मिळाला होता. म्हणून या शापमुळे राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला. या गणपतीची आराधना शकुंतलेने केल्याने दुष्यंताला सारे काही आठवले व शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणजेच टिटवाळ्याचा महागणपती आहे. 

Edited By- Dhanashri Naik