मथुरा, भगवान श्रीकृष्णाची नगरी, खूप खास आहे, या ठिकाणांना एकदा अवश्य भेट द्या!  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  मथुरा, भगवान कृष्णाचे शहर म्हणून ओळखले जाणारे धार्मिक स्थळ जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी जगभरातून पर्यटक येतात. हे ठिकाण भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. येथील कृष्ण मंदिराशिवाय इतरही अनेक ठिकाणे आहेत जिथे फिरायला जाऊ शकता. आग्रा मथुरेपासून 56 किमी अंतरावर आहे.आपण मथुरेसह आग्रा देखील फिरायला जाऊ शकता.चला मथुरेच्या काही प्रमुख ठिकाणांबद्दल जाणून घ्या.
				  													
						
																							
									  
	 
	1 कृष्णजन्मभूमी-
	जर तुम्ही मथुरेला जात असाल तर सर्वप्रथम कृष्णजन्मभूमी मंदिरात जा. हे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. हे मंदिर त्याच तुरुंगाबाहेर बांधले गेले आहे जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. असे म्हटले जाते की शुद्ध सोन्याने बनवलेली श्रीकृष्णाची 4 मीटरची मूर्ती होती, जी महमूद गझनवीने चोरली होती. 
				  				  
	 
	2 बांके बिहारी मंदिर-
	मथुरेतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक म्हणजे बांके बिहारी मंदिर. हे राधावल्लभ मंदिराजवळ आहे.भगवान कृष्णाचे दुसरे नाव देखील बांके बिहारी आहे. या मंदिरातील बांकेबिहारीची मूर्ती काळ्या रंगाची आहे. या मंदिरात जाण्यासाठी अरुंद गल्ल्यांतून जावे लागते.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	3 द्वारकाधीश मंदिर-
	तुम्हाला भगवान कृष्णाशी संबंधित कलाकृती पाहायच्या असतील तर तुम्ही द्वारकाधीश मंदिराला भेट देऊ शकता. विश्राम घाटाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर 1814 मध्ये बांधले गेले. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, विशेषत: जन्माष्टमीच्या वेळी येथे अधिक गर्दी दिसून येते.
				  																								
											
									  
	 
	4 मथुरा संग्रहालय-
	मंदिराला भेट देण्याव्यतिरिक्त, आपण संग्रहालय देखील पाहू शकता. मथुरा म्युझियम 1974 मध्ये बांधले गेले. या संग्रहालयाचे नाव आधी कर्झन म्युझियम ऑफ आर्किओलॉजी असे होते. येथे आपण कुशाण आणि गुप्त राजवंशाशी संबंधित अनेक कलाकृती पाहू शकता. यात अद्वितीय वास्तू आणि अनेक कलाकृती आहेत, त्याचे चित्र भारत सरकारच्या स्टॅम्पवर देखील छापलेले आहे.
				  																	
									  
	 
	5 कुसुम सरोवर-
	मथुरेतील प्रमुख ठिकाणांपैकी एक म्हणजे कुसुम सरोवर. हे सुमारे 60 फूट खोल आणि 450 फूट लांब आहे. या तलावाला राधाचे नाव देण्यात आले आहे. असे म्हणतात की येथे भगवान श्रीकृष्ण आणि राधा भेटायला येत असत. अनेक लोक कुसुम सरोवरात स्नान करण्यासाठी देखील येतात, येथील पाणी शांत आणि स्वच्छ आहे. येथे होणारी संध्याकाळची आरती हे येथील मुख्य आकर्षण असते, अनेक पर्यटक हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात.
				  																	
									  
	 
	6 गोवर्धन पर्वत-
	जर तुम्ही मथुरेला भेट द्यायला आला असाल तर गोवर्धन पर्वत जरूर बघा. हिंदू पुराणात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाने हा पर्वत आपल्या करंगळीने उचलला होता. या गोवर्धन पर्वताला ला भेट देणारे लोक नक्कीच या गोवर्धन पर्वताच्याभोवती प्रदक्षिणा घालतात. असे करणे शुभ मानले जाते  असं केल्याने भगवान श्रीकृष्णाची विशेष कृपा मिळते. अशी आख्यायिका आहे.
				  																	
									  
	 
	7 कंस किल्ला-
	कंस किल्ला जयपूरचे महाराज मानसिंग यांनी बांधला होता. अकबराच्या नवरत्नांमध्ये मानसिंगचा समावेश होता. हिंदू आणि मुघल स्थापत्यकलेच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण, हे मंदिर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे.