बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (15:03 IST)

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, काही गँगस्टर उठले जीवावर

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून मुंबई पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. काही गँगस्टर सलमानच्या जीवावर उठले आहेत. संपत नेहराचे तीन सहकारी सलमानच्या जीवाला धोका पोहोचण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. अर्थात पोलिसांना या तिघांचे लोकेशन अद्याप मिळालेले नाही. राजू, अंकित, अक्षय हे संपतचे तीन सहकारी आहेत. हे तिघांकडून सलमानला धोका आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी म्हणून सलमानला पर्सनल बॉडीगार्ड देण्यात आले आहेत. तसेच त्याचे घर आणि सेटवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
 
काही दिवसांपूर्वी हरयाणाच्या स्पेशल टास्क फोर्सने मोस्ट वॉन्टेड गँगस्टर संपत नेहराला हैदराबाद येथून अटक केली होती. २८ वर्षांच्या या गँगस्टरने सलमान मारण्याचा प्लान आखला आहे. त्याच्या अटकेनंतर देखील त्याच्या सहकाऱ्यांकडून तो सलमानला मारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सलमानला धोका अद्याप टळला नाही, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.