1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (15:03 IST)

'भारत' साठी प्रियंकाने इतके घेतले मानधन

Priyanka
सलमान खानच्या 'भारत' या सिनेमात प्रियंका चोप्रा दिसणार आहे. आता तिने 'भारत' या सिनेमासाठी किती मानधन घेतलं याची चर्चा होत आहे. 'भारत' या सिनेमासाठी प्रियंकाने तब्बल 12 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केली आहे. आणि हे तिला मिळाल्याची माहिती आहे. कारण तिने सिनेमा आधीच साइन केलाय. एका सिनेमासाठी 12 कोटी रुपयांचं मानधन घेणारी प्रियंका ही बॉलिवूडची दुसरी अभिनेत्री असेल. याआधी दीपिका पादुकोणने पद्मावतसाठी 12 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.