मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (08:38 IST)

चक्क मतदान घेऊन झाले बाळाचे नामकरण

गोंदिया येथील देवरीमध्ये मतदान करून बाळाचं नामकरण करण्यात आल आहे. यासाठी  बंग परिवाराने चक्क बॅलेट पेपरचा वापर केलाय. भारतीय समाजात कुंडलीनुसार नाव ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसारच बंग परिवारात नुकत्याच जन्माला आलेल्या  बालकाचे यक्ष, युवान व यौवीक ही तीन नावे सुचविण्यात आली होती. मात्र, यापैकी एका नावाला पसंती मतदानाचा प्रक्रियेतून मिळावी अशी बंग परिवाराची इच्छा होती. त्यामुळे नामकरण सोहळ्याला चक्क मतदान केंद्राचे स्वरूप देत बॅलेट पेपर चा वापर करीत मतदान घेण्यात आले.
 
अनोख्या नामकरणाची जोरदार चर्चा या नामकरण सोहळ्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण १४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत ९२ मतदारांनी यूवान या नावावर शिक्कामोर्तब केले. एकंदरीतच बंग परिवारातर्फे आयोजित या आगळ्या वेगळ्या, नामकरण सोहळ्याला मतदारांनी मतदान करीत आपली चांगली उपस्थिती दर्शविली.