शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 मे 2018 (12:41 IST)

मोदींनी स्वीकारलं विराटचं‘फिटनेस’चॅलेंज

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिलेलं चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे.‘विराट तुझं आव्हान मी स्वीकारलं, लवकरच याबाबतचा व्हिडीओ मी शेअर करेन’,असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
 
केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं होतं. फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा स्वतःचा एक व्हिडीओ राठोड यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. त्यानंतर कोहलीने हे चॅलेंज स्वीकारुन पूर्ण केलं आणि, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुष्का शर्मा आणि एमएस धोनी यांना टॅग करीत या तिघांना फिटनेसचे आव्हान दिले होते. या तिघांपैकी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराटचं आव्हान स्वीकारलं आहे. अनुष्का शर्मा आणि धोनी यांनी अद्याप विराटने दिलेले आव्हान स्वीकारले नाही.