बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 22 मे 2018 (17:41 IST)

अशी आहे आयपीएलच्या फायनल कार्यक्रमाची तयारी

आयपीएल २०१८ फायनलचा सामना २७ मे रोजी मुंबईमध्ये रंगणार आहे. यात  या सामन्यापूर्वी २ तास आधी होणाऱ्या कार्यक्रमाला होस्ट करण्याची संधी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला मिळाली आहे. रणबीर कपूर आयपीलचा ‘प्रील्यूड’ कार्यक्रम पहिल्यांदाच होस्ट करणार असून या दोन तासांसाठी त्याला एक कोटी रुपये एवढी भरभक्कम रक्कम मिळणार आहे. 

या दोन तासांच्या कार्यक्रमामध्ये अनेक सिनेकलाकार सहभागी होणार आहेत. यात बॉलिवूडचा दबंग सलमान खान, रेस-३ ची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, नवाबांची सून अभिनेत्री करिना कपूर आणि बॉलिवूडची स्टाईल आयकॉन अभिनेत्री सोनम कपूर सहभागी होणार आहेत. सलमानसह अभिनेता अनिल कपूरही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. फिटनेसचा बादशहा जॉन अब्राहम ‘परमाणू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावेल. तसेच टीव्ही स्टारही येथे दिसणार आहेत. रवी दुबे, गौरव सरीन, आकृति शर्मा आणइ देशना दुहल हे टीव्ही स्टार या कार्यक्रमाची शान वाढवताना दिसतील.