बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 14 मे 2018 (13:48 IST)

जगाच्या दीर्घ सफरीवर निघाले नॉर्वेचे वायकिंग सन क्रुझ

नॉर्वेचे वायकिंग सन क्रुझ जगाच्या सफरीवर निघण्यासाठी सज्ज झाले असून हा 245 दिवसांचा प्रवास येत्या ऑगस्टध्ये ग्रीनविचपासून सुरु होणार आहे आणि तो ग्रीनलंडध्ये संपणार आहे. या प्रवासात हे क्रुझ 113 बंदरे आणि 59 देश फिरणार असून त्यात 930 प्रवासी असतील. या प्रवासासाठी एका प्रवाशाचे कमीत कमी भाडे 60 लाख रु. आहे. अंटार्टिका सोडून बहुतेक सर्व खंडातून या क्रुझचा प्रवास होणार आहे. या क्रुझवर प्रवाशांना शास्त्रीय संगीत बॅन्ड, इतिहास, कला, कुकरीवर लेक्चर ऐकता येतील तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातील विविध पदार्थांचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी 8 प्रकारची रेस्टॉरंट आहेत. दोन पूल असून तेथून थेट समुद्र दर्शन होणार आहे. थर्मल स्पा, स्नो ग्रॅटो याची मजाही लुटता येईल. क्रुझवर पाच प्रकारच्या रूम्स असून सर्वात छोटी 270 चौरस फुटाची आहे. कपलसाठी 1 कोटी 21 लाख रुपये भरावे लागतील तर स्यूटसाठी प्रतिप्रवासी 1 कोटी 76 लाख भरावे लागणार आहेत. क्रुझचे सर्व बुकिंग फुल झाले आहे. या क्रुझने यापूर्वीही प्रवास केला आहे. मात्र, आताचा प्रवास त्यावेळेपेक्षा दुप्पट अंतराचा आहे. प्रवासी सामान पॅक अनपॅक न करता प्रवासाचे सुख उपभोगू शकणार आहेत.