रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गांधीनगर , सोमवार, 30 एप्रिल 2018 (14:25 IST)

नरेंद्र मोदी आणि भीमराव आंबेडकर ब्राह्मण

गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी संविधान निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र यांना ब्राह्मण सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नारदाची तुलना गूगलशी केली होती.  
 
'मेगा ब्राह्मण बिझनेस समिट'ला संबोधित करताना राजेंद्र त्रिवेदी यांनी म्हटले की बीआर आंबेडकर यांना ब्राह्मण म्हणताना मला काही संकोच नाही. त्यांनी म्हटले की शिकलेल्या लोकांना ब्राह्मण म्हणण्यात काहीच चुकीचे नाही आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ब्राह्मण आहे.  
महत्त्वाचे म्हणजे याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी देवर्षि नारद यांची तुलना गूगलशी केली होती. तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी असे म्हणून खळबळ केले होते की महाभारत काळात देखील इंटरनेट चालत होते.