मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

का शाह यांनी बिप्लब यांना बोलविले दिल्लीला?

पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांनी बिप्लब देब यांनी 2 मे रोजी दिल्लीत बोलावलंय. मोदी आणि शाह यांच्याकडून देब यांना थेट समज दिली जाणाराय. 'देब यांच्या विधानांमुळे पक्षातील वरिष्ठ नेते नाराज आहेत. देब तोंडाला येईल ते बोलत सुटले आहेत. त्यामुळे स्वत: मोदी त्यांच्याशी बोलून त्यांना योग्य ती समज देतील,' अशी माहिती भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यांनं दिली. 
 
काही दिवसांपूर्वीच मोदी यांनी पक्षातील नेत्यांना वादग्रस्त विधानं टाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. 'वादग्रस्त वक्तव्य माध्यमांना मसाला देऊ नका,' असा आदेश मोदींनी दिला होता. मात्र यानंतरही देब यांच्याकडून वादग्रस्त विधानं सुरूच आहेत.देब यांनी गेल्या महिन्यात त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र यानंतर ते कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले.