सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

तिरुपती मंदिराकडे बाद झालेल्या २५ कोटींच्या नोटा जमा

तिरुपती मंदिराच्या हुंडीत ५०० आणि १ हजारांच्या २५ कोटींचे मूल्य असलेल्या नोटा जमा झाल्या आहेत. या सगळ्या नोटा चलनातून बाद झाल्या आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद होतील अशी घोषणा केली. आता तिरूपती मंदिर प्रशासनाकडे ५०० आणि १ हजाराच्या २५ कोटींच्या नोटा आहेत. 
 
अनेक भक्तांनी श्रद्धेने या नोटा हुंडीमध्ये टाकल्या आहेत. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये या नोटा जमा झाल्या आहेत. तिरुमला तिरूपती देवस्थानने भाविकांनी दिलेल्या दानामागच्या भावना लक्षात घेऊन या नोटा बदलून मिळण्यासाठी आरबीआयला पत्र लिहिले आहे. या पत्राचे सकारात्मक उत्तर येईल अशी अपेक्षा आहे असे मंदिर समितीचे अतिरिक्त आर्थिक सल्लागार ओ बालाजी यांनी म्हटले आहे.