बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

केरळमधील एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडणार

यूपी, बिहार पोटनिवडणुकीत पराभवानंतर आता केरळमधील भाजपचा एकमेव मित्रपक्ष भारतीय धर्म जन सेना(बीडीजेएस)ने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीने याआधी भाजपची साथ सोडली आहे. त्यानंतर बिहारमधील नेते जितंनराम मांझी यांनी देखील एनडीएला रामराम केला. 
 
बीडीजेएस प्रमुख वेल्लापल्ली नटेसन हे भाजपवर नाराज होते. केंद्र सरकारकडे त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. पण त्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी एनडीएची साथ सोडली आहे. 2015 मध्ये भारतीय धर्म जन सेनेची स्थापना झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत एनडीएमध्ये सहभागी झाले होते.केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. डाव्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने यांचा हात पकडला होता पण त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे.