सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

वडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी

'वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. आम्ही खपू तणावात होतो. परंतु कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर आमचा विश्वास नसल्याने मी आणि प्रियांकाने वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं,' असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
 
सिंगापूर येथे आयआयएममध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तुम्ही जेव्हा भूमिका घेता तेव्हा उपद्रवी लोक तुमच्या विरोधात जातात. त्यामुळे तुमचा मृत्यू अटळ असतो. वडील आणि आजीने घेतलेल्या भूमिकांमुळे त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, याची आमच्या कुटुंबाला कल्पना होती, असं राहुल यांनी सांगितलं. 
 
वडील मृत्यूला सामोरे जात आहेत. हे आम्हाला माहित होतं. आमची आजी इंदिरा गांधीही मृत्यूला सामोरे जात आहेत, हे सुद्धा आम्हाला माहित होतं, असं सांगतानाच मी मरणाला सामोरे जात आहे, असं इंदिरा गांधी यांनी घरात सांगितलं होतं. वडिलांनीही तेच सांगितलं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राहुल यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे.