सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सुरेश प्रभूकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी

राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यानंतर कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभु यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची देखील जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून तेलुगू देशम पक्षाचे अशोक गजपती राजू यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या मंत्रालयाचा अधिक भार हा सुरेश प्रभू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
 
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिऴावा या मागणीसाठी टीडीपीने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एनडीएमधून टीडीपी बाहेर पडल्याने टीडीपीच्या 2 मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर राष्ट्रपतींनी तो मंजूर केला आहे.