1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गुगलची भानगड, नाव नेहरूंचे फोटो मोदींचा

India first PM
गुगलवर जेव्हा ‘India first PM’ असे सर्च केल्यानंतर आलेल्या तपशिलांमध्ये नाव तर पंडित जवाहरलाल नेहरूंचे येते. पण फोटो मात्र पंतप्रधान मोदींचा दिसत आहे. हे कधीपासून होत आहे हे अद्याप समजलेले नाही. सोशल मीडियावर अचानक सर्वजण ही गोष्ट सर्च करू लागले. एका यूझरने ट्विटरवर या गोष्टीचा स्क्रिनशॉट ट्विट केला. हा स्क्रीन शॉट पाहिल्यानंतर अनेकांनी गुगल सर्च केला. त्यावेळी अनेकांना धक्का बसला आणि सर्वांनी या सर्चचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आणि या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले. काही जणांनी हे फोटो गुगललाही टॅग केले आहेत.
 
ही गुगलची खुप मोठी चूक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. या गोष्टीवरून अनेक नेटकऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे. अनेक युझर्सनी ही बाब देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहे असेही सांगितले आहे.