मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 एप्रिल 2018 (16:11 IST)

दुर्घटनेसाठी बसचालकाचा बेजबाबदारपणा

Uttar Pradesh School Bus Accident
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेसाठी बसचालकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. चालकाच्या कानात इअरफोन होते आणि यामुळेच त्याला ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अशी माहिती मिळाल्याचे सांगितले असून याची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
गुरुवारी सकाळी कुशीनगरमधील दुदही येथील रेल्वे क्रॉसिंगवरुन डिव्हाईन इंग्लिश स्कूल या शाळेची बस जात होती. बसमध्ये सुमारे २० विद्यार्थी होते. यादरम्यान रेल्वे क्रॉसिंगजवळ सिवान- गोरखपूर पॅसेंजर ट्रेनही पोहोचली. ट्रेनने दिलेल्या धडकेत बसमधील १३ जणांचा मृत्यू झाला.