बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारत देश सहिष्णू, जगात चौथ्या क्रमांकावर

जागातील सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. 
 
यावर्षाच्या सुरूवातीला इप्सॉस मॉरी यांनी बीबीसीसाठी 27 देशांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सुरूवातीला त्यांनी 20 हजार लोकांनाच्या मुलाखती घेतल्या. लोकांच्या मते समजाचं विभाजन करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहे? याबद्दल माहिती गोळा करण्यात आली. सर्व्हेनुसार 63 टक्के 
 
भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते  भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो. 
 
भारतीय समाजात राजकीय विचारातील मतभेद तणावाचं कारण बनत असल्याचं 49 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 48 टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर 37 टक्के लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते. दुसऱ्या 
 
संस्कृतीच्या, पार्श्वभूमीच्या लोकांशी मिळून-मिसळून राहिलं की आदर व सन्मानाची भावना निर्माण होते असं 53 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये सांगितलं आहे.