शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बराक ओबामा यांनी पत्र पाठवून मागितली माफी

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी मालिया हिचा नवा बॉयफ्रेंड रॉरी फॉर्कुर्सन याला पत्र पाठवल्याचं वृत्त येथील माध्यमांनी दिलं आहे.
 
स्वतः प्रसि द्ध असल्याबद्दल बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी रॉरी फॉर्कुर्सन याला पत्र पाठवून माफी मागितली आहे. आपल्या मुलीसोबत नाव जोडल्यामुळे रॉरी फॉर्कुर्सनला मीडियाचं टेन्शन असेल, त्याच्या कुटुंबियांना नाहक त्रास होत असेल म्हणून बराक ओबामा यांनी माफी मागितली असल्याचं वृत्त येथील माध्यमांनी दिलं आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, बराक ओबामांची मुलगी मालिया (19) आणि रॉरी(20) यांची गेल्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना ओळख झाली.