शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रिंस विल्यम आणि केट मिडलटनला तिसरा मुलगा झाला

प्रिंस विल्यम आणि केट मिडलटन यांच्या आयुष्यात आता तिसर्‍या अपत्याचं आगमन झालं आहे. सोमवारी सकाळी लंडनमध्ये केटने एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. हा  शाही गादीचा पाचवा वारसदार असणार आहे.  लंडनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सेंट मेरी हॉस्पिटल्समध्ये झाला. बाळाचे वजन 3.8 असून नवमाता आणि बाळ दोघेही सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

'ड्युक ऑफ कॅंम्ब्रिज' या मुलाच्या जन्माच्या वेळेस उपस्थित असल्याची माहिती देण्यात आली आहे.  केट आणि विल्यम हे सात वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले आहे. 29 एप्रिलला ही जोडी त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजारा करणार आहेत. केट आणि विल्यम यांना प्रिंस जॉर्ज, त्यानंतर एक प्रिंसेंस शैरलोट आणि आता तिसरा मुलगा आहे. 
 
लंडनच्या राजघरात नव्या चिमुकल्याच्या आगमानाच्या आनंदासोबतच प्रिंस हॅरीच्या लग्नाची तयारीदेखील सुरू आहे. प्रिंस हॅरी अमेरिअक्न अभिनेत्री मेगन मार्कलसोबत 19 मे 2018 रोजी विवाहबद्ध होणार आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.