1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 जुलै 2025 (20:41 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनांना धडकला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर २१  जण जखमी झाले आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.  
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक अनेक वाहनांना धडकला. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अपघातग्रस्त वाहनांची रांग असल्याचे दिसून येते. या अपघातात किमान एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर २१ जण जखमी झाले आहे. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेलरने खंडाळा घाटावर अनेक वाहनांना धडक दिल्याने हा अपघात झाला. अशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik