बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे. पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील. दरम्यान , सरकारने न्यायाधीश के.एम.जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत.
 
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कॉलेजियमने उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस केली होती. दोघांच्या बढतीबाबतची शिफारस जवळपास तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती अशी माहिती आहे. २२ जानेवारी रोजी याबाबतची फाईल कायदा मंत्रालयाला मिळाली होती. मात्र, जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना इंदू यांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे.