शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या  शिक्षेला राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं आसारामच्या प्रवक्त्या निलम दुबे तसंच त्याच्या वकिलांनी म्हटलंय.  तर न्यायालयाच्या निकालानंतर न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिलीय. 
 
15 ऑगस्ट 2013 मध्ये आसारामनं एका अल्पवयीन मुलीवर आसारामनं बलात्कार केला.  जोधपूरमधल्या मणाई गावातल्या त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर करत होता. आसाराम मुलींना भूतप्रेताची भीती दाखवायचा. अशीच भीती दाखवत त्यानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले. या कामासाठी आसारामचे साथीदार शिल्पी आणि शरदही त्याला मदत करायचे. याच शिल्पीनं पीडित मुलीला भूतबाधा झाल्याचं तिच्या आई वडिलांना सांगितलं. या पीडित मुलीचे आई वडील आसारामला देव मानायचे. ते तिला घेऊन मणाई आश्रमात आले. आसारामनं तिच्या आई वडिलांना रात्रभर आश्रमातल्या एका कुटीबाहेर थांबायला सांगितलं आणि रात्रभर मुलीवर बलात्कार राहिला. आसारामवर खटला सुरू झाल्यानंतर 9 साक्षीदारांवर हल्ले झाले, त्यात तिघांचा मृत्यू झालाय.
 
आसारामवर धर्मगुरु बनून बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी,  बलात्कारासाठी अपहरण करणे, अश्लील चाळे करणे, धमकी देणे, महिलांचा स्वाभिमान दुखावणे या सगळ्या आरोपांप्रकरणी आसारामला दोषी ठरवण्यात आलंय.