बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (17:21 IST)

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात, कार उलटल्याने चालकाचा मृत्यू तर अनेक जखमी

महाराष्ट्र बातम्या
चंद्रपूरमधील चिचपल्ली-जुनोना रस्त्यावर वेगाने जाणारी कार तीन वेळा उलटल्याने चालकाचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर मध्ये चिचपल्ली-जुनोना रस्त्यावर वेगाने जाणारी कार तीन वेळा नियंत्रण गमावून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. रात्री १ वाजता जंगलातील एका वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे गाडी तीन वेळा उलटली. सर्व प्रवाशांना हात, पाय आणि डोक्याला दुखापत झाली. अपघात इतका गंभीर होता की चालक मुकेश दोनाडकर हा स्टीअरिंग व्हील आणि सीट बेल्टमध्ये अडकला, ज्यामुळे तो बाहेर पडू शकला नाही. तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.