शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025 (15:29 IST)

मराठी साहित्यविश्वात शोककळा

rip
सुप्रसिद्ध मराठी कवी आणि हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज शुक्रवार, २८ नोव्हेंबर रोजी अमरावती येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथे सुप्रसिद्ध मराठी कवी आणि हास्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. ते दीर्घकाळापासून मूत्रपिंडाच्या (किडनीच्या) आजाराने त्रस्त होते. तसेच त्यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू होते. 
 
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे 'मिर्झा एक्सप्रेस' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होते. त्यांनी आपल्या खुमासदार नर्मविनोदी शैलीमुळे मराठी कवी संमेलनांमध्ये हास्यसम्राट म्हणून विशेष स्थान मिळवले होते. तसेच त्यांचे २० हून अधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचा 'मिर्झाजी कहीन' हा वर्तमानपत्रातील स्तंभही खूप लोकप्रिय होता.
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव असून ते अमरावती येथे नवसारी परिसरात ‘मिर्झा एक्सप्रेस’ नावाच्या घरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा  आणि दोन मुलीअसा परिवार आहे. 
त्यांच्या निधनाने विदर्भ आणि संपूर्ण मराठी साहित्य तसेच कवी संमेलन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या काव्य आणि साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर आज दुपारी अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
Edited By- Dhanashri Naik