Editor Letters

Notifications

  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. वाचकांची पत्रे



२१ वर्षीय मॉडेलची थरारक हत्या; घरात घुसून जिम ट्रेनर इम्रानने संपवले मुस्कानचे आयुष्य!

२१ वर्षीय मॉडेलची थरारक हत्या; घरात घुसून जिम ट्रेनर इम्रानने संपवले मुस्कानचे आयुष्य!नवी दिल्ली: पश्चिम दिल्लीतील तिलक नगर भागातील 'ओल्ड महावीर नगर'मधील एका बहुमजली इमारतीत बुधवारी संध्याकाळी किंकाळ्या आणि घबराटीचे वातावरण पसरले. तिथे राहणाऱ्या मुस्कान या २१ वर्षीय विद्यार्थिनीची आणि अर्धवेळ मॉडेलची तिच्याच घरात निर्घृणपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी ती तरुणी दुसऱ्या मजल्यावरील तिच्या खोलीत पूर्णपणे एकटीच होती. अचानक झालेल्या या भयंकर हल्ल्यानंतर आरोपीने त्या तरुणीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. किंकाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून ते हादरून गेले. मुस्कानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.