राष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी?
राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या राष्ट्रकुल अध्क्षयपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड होणची शक्यता आहे.
इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी नरेंद्र मोदी येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापूर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लंडलाही भारताने कॉनमवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी असे वाटते.