रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मार्च 2026 (17:16 IST)

जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

जिष्णू देव वर्मा
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांनी आज, १० मार्च २०२६ रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.ते पूर्वी तेलंगणाचे राज्यपाल होते आणि राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांची महाराष्ट्राकडे बदली झाली.
शपथविधी लोकभवन (माजी राजभवन), मुंबई येथे दुपारी 4:30 वाजता पार पडला. शपथ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली.
 
सोमवारी (9 मार्च) ते मुंबईत दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. पत्नी सुदा देव वर्मा यांच्यासह ते आले होते. त्यांना राज्य पोलीसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
या नियुक्ती बदल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 6-7 मार्च 2026 च्या सुमारास केले होते, ज्यात अनेक राज्यांमध्ये राज्यपालांच्या बदल्या झाल्या.
जिष्णू देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या अनुभवी नेते मानले जातात. त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात आजपासून अधिकृतपणे झाली आहे.
Edited By - Priya Dixit