बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (17:16 IST)

आता वेध 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' चे

‘अवेंजर्स: इन्‍फिनिटी वॉर’ नंतर आता यावर्षीचा बहुचर्चित एपिक ॲक्शन-ॲडव्‍हेंचरस चित्रपट 'जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम' रिलीज होण्‍यास सज्‍ज आहे. अमेरिकेत रिलीज होण्‍याच्‍या दोन आठवड्‍यांपूर्वी हा चित्रपट ८ जूनला भारतात रिलीज होणार आहे. देशभरात २३०० पेक्षाही अधिक स्क्रीन्‍सवर इंग्रजी, हिंदी, तमिळ अणि तेलुगू भाषेत रिलीज करण्‍यात येणार आहे. 

जे. ए. बायोनाने हा चित्रपट दिग्‍दर्शित केला आहे. याआधी 'जुरासिक वर्ल्ड: फॉलेन किंगडम’चा टीजर रिलीज करण्‍यात आला आहे. त्‍यात जेफ गोल्डब्लम, क्रिस प्रॅट, ब्राईस डलास हॉवर्ड आणि इयान मॅल मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा अमेरिकेत २२  जूनला रिलीज होणार आाहे. याआधी २०१५ मध्‍ये रिलीज झालेला 'जुरासिक वर्ल्ड'ने भारतात बॉक्स ऑफिसवर १४७ कोटींचा बिझनेस केला होता. हा चित्रपट भारतात टॉप-५ हॉलिवूड चित्रपटांपैकी एक होता.