रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मे 2018 (13:57 IST)

अक्षयचा आगामी चित्रपट शेतकर्‍यांवर आधारित

अभिनेता अक्षयकुार आता देशातील शेतकर्‍यांवर चित्रपट काढणार आहे. देशात होणार्‍या शेतकरी आत्महत्या, त्यांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्र्न यावर दिशा दाखवणारा अक्षयचा आगामी चित्रपट असणार आहे. यातून एक सामाजिक संदेश देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नावही त्याने जाहीर केले. नुकत्याच झालेल्या न्यू इंडिया कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमात अक्षयकुमारने हजेरी लावली होती. आपला आगामी चित्रपट शेतकरी आणि गावावर आधारित असेल, असे यावेळी त्याने सांगितले.
 
हुंडा या विषयाशी संबंधित ठोस काही हाती आल्यास ह्या विषयावरही चित्रपट करायला आवडेल, असे काही दिवसांपूर्वीच अक्षय म्हणाला होता. देशातील छोटी-छोटी गावे आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करुन देतात. गाव हे आपल्या वडिलांसारखे असते आणि शहर हे तरुण मुलांसारखे. आपल्या वडिलांची काळजी घेणे आणि त्यांची सेवा करणे हे तरुण मुलाचे कर्तव्य आहे. तसेच हुशार माणसे नेहमी शहरातच असतात असे नसते. गावातसुद्धा अनेक हुशार माणसे आहेत, असे अक्षयने सांगितले.