1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 22 मार्च 2018 (14:37 IST)

अक्षय कुमार खासदार होणार?

akshay kumar
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध उद्योजिका अनु आगा आणि अभिनेत्री रेखा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे या तीन जागांवर वर्णी लागावी म्हणून उद्योगजगत आणि बॉलिवूडध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. रेखा यांच्या रिक्त होणार्‍या जागेवर बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय अभिनेत्री जुही चावला, गजेंद्र चौहान, अनुपम खेर, सलीम खान, सुरेश ओबेरॉय, विवेक ओबेरॉय आणि ऋषी कपूर यांचीही नावे राज्यसभेच्या या एका जागेसाठी चर्चेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.