बुधवार, 19 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:17 IST)

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

akshay kumar

गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली होती.  या टीकेवर अक्षय कुमारनं प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळे मला वाईट वाटलं नाही. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं, असं अक्षय कुमार म्हणाला आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये अक्षय कुमारनं हे वक्तव्य केलं आहे. 

अक्षय कुमारचे चित्रपट सरकारचा प्रचार करणारे वाटतात. अक्षय कुमार मनोज कुमार बनण्याचा प्रयत्न करतोय. मनोज कुमारला भारत कुमारही म्हणलं जायचं. अक्षय कुमार देशभक्तीच्या गोष्टी करतो पण तो स्वत: भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.