सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 4 एप्रिल 2018 (13:27 IST)

शाहरुख खानहून पुढे निघाला अजय देवगन आणि केली अक्षयची बरोबरी

अजय देवगनचे चित्रपट रेड 100 कोटीच्या क्लबामध्ये सामील झाले आहे. लागोपाठ अजय ने दोन यशस्वी चित्रपट दिले आहे. त्याचे आधीचे चित्रपट 'गोलमाल अगेन'ने 200 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे कलेक्शन केले होते आणि अजयच्या करियरचे हे सर्वात हिट चित्रपट साबीत झाले.
 
शंभर कोटी क्लबामध्ये अजय देवगनचे 8 चित्रपट झाले आहे. या प्रकारे तो शाहरुखहून पुढे निघाला आहे. किंग खानचे 7 चित्रपट या क्लबामध्ये सामील आहे.
अक्षय कुमाराचे आठ चित्रपट या एलीट समूहाचे भागीदार झाले आहे आणि अजयने आता अक्षयची बरोबरी केली आहे. या दोघांपेक्षा पुढे फक्त सलमान खान आहे ज्याचे 12 चित्रपट शंभर कोटी क्लबाचे भागीदार झाले आहे.
 
महत्त्वाची बाब अशी आहे की सलमानने लागोपाठ 12 चित्रपट असे दिले आहे ज्यांनी शंभर कोटीचा गल्ला क्रास केला आहे. अर्थात दबंग ते टायगर जिंदा है पर्यंत.

बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या या एलीट समूहात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची 5, रितिक रोशन आणि वरुण धवनचे 4-4 व रणबीर कपूर आणि रणवीर सिंह यांचे 3-3 चित्रपट सामील आहे.