शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फॉलोवर्ससाठी शाहरुखने मारली पाण्यात उडी

एकीकडे अमिताभ बच्चन यांचे टि्वटरवरील फॉलोवर्स कमी झाले म्हणून ते टि्वटरवाल्यांवर नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे शाहरुखच्या फॉलोवर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. बॉलीवूडच्या किंग खानचे टि्वटर 3.3 कोटी फॉलोवर्स झाले आहेत. शाहरुख त्याच्या टि्वटर अकाउंटच्या संख्येत वाढ झाली की चाहत्यांना नेहमीच वेगळ्या पद्धीने धन्यवाद म्हणत असतो.
 
आता 3.3 कोटी फॉलोवर्स झाले म्हटल्यावर यासाठीचे एक वेगळेच सेलिब्रेशन असणार ना. बॉलीवूडचा बादशहा म्हटल्यावर त्याने सेलिब्रेशनही हटके असणार, यात काही शंका नाही. त्याने चाहत्यांचे आभार मानण्यासाठी चक्क स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. पाण्यात उडी मारताना त्याने विशेष पेहराव केला होता. त्याने महागडा सूट घातला होता आणि काळ्या रंगाचा गॉगल घातला होता.
 
शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की मी कधीच नियोजन करुन काम करत नाही. पण आज मात्र मी ठरवून तुमच्यासाठी एक गोष्ट करणार आहे. मी जे काही करतोय त्यात चूक बरोबर पाहू नका. त्यामागच्या माझ्या भावना पाहा.