बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

BMCने शाहरुख खानच्या प्रॉडक्‍शन हाउसचे अवैधानिक निर्माणावर हातोडा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुखने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले. डीएलएच पार्क बिल्डींगमध्ये रेड चिलीजचे कार्यालय आहे. रेड चिलीजने ओपन टेरेसचे रुपांतर उपहारगृहात केल्यामुळे महापालिकेनेही कारवाई केली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुमारे २००० चौरस फुटाच्या जागेवर हे उपहारगृह होते.
 
टेरेसवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्याची परवानगी नव्हती. त्याशिवाय अग्नी सुरक्षेसंबंधीचे नियम आणि एफएसआय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.