शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

निमंत्रण नव्हतं तरी शाहरुखच्या पार्टीत पोहचला कपिल

कॉफी विद करण शोमध्ये कपिलने अनेक मनोरंजक किस्से सांगितले. कपिलने सांगितलं की एकदा तो शाहरुख खानच्या घरी निमंत्रण नसताना पोहचला. झाले असे की कपिलचा चुलत भाऊ मुंबई आला आणि शाहरुखचं घर बघण्याच्या जिद्दीला पेटला. कपिल त्याला घेऊन शाहरुखच्या घरी पोहचला.
शाहरुखच्या घरचे दार उघडे होते तर दोघे आत पोहचले. गॉर्ड कपिलला ओळखून होता म्हणून त्याने त्यांना अडवे नाही. आत बघितलं तर पार्टी सुरू होती. शाहरुखची पत्नी गौरी खानने त्याला ओळखले. नंतर शाहरुख तिथे पोहचला तर कपिलने त्याला सांगितले की आम्ही निमंत्रण नसून येथे आपल्या भेटायला आलो आहोत. यावर शाहरुख म्हणाला की ही गोष्ट केवळ आम्हा दोघांना माहीत आहे म्हणून तुम्ही तर पार्टीचा आनंद घ्या.